श्री गजानन महाराज यांचा १४३ वा प्रगटदिन | Shree gajanan maharaj | pune

2021-03-05 2

श्री गजानन महाराज यांचा १४३ वा प्रगटदिन
पुणे : श्री गजानन महाराज यांचा आज १४३ वा प्रगटदिन. सहकारनगर येथील श्री गजानन महाराज शेगाव सेवा प्रतिष्ठानच्या मंदिरात झेंडू, गुलाब, शेवंती आदी फुलांपासून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा होत आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर आदींची व्यवस्था करून भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. मात्र दरवर्षी होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम व इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे विश्वस्त पौर्णिमा भारत पवार यांनी सांगितले.